ट्रस्टची माहिती

चिंचवड देवस्थान ट्रस्ट माहिती

चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे मोरगाव, सिद्धटेक, थेऊर आणि चिंचवड या देवस्थानांची सर्व व्यवस्था पाहिली जाते. संस्थानतर्फे या ठिकाणी भक्‍तांसाठी यात्री निवास, स्वच्छतागृहे, अल्प दरात दुपारी भोजन प्रसाद यासारख्या विविध सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे राबवले जाणारे उपक्रम

१) श्रीमयूरेश्‍वर मंदिर (मोरगाव), श्रीसिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक) व चिंतामणी मंदिर (थेऊर) या देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली असलेल्या ठिकाणी भक्तांसाठी विविध सोयी उपलब्ध.

१. भक्त निवास: भाविकांसाठी सुसज्ज व प्रशस्त भक्त निवास.
२. भोजन प्रसाद: ट्रस्ट तर्फे मंदिर परिसरात दररोज दुपारी अल्पदरात भोजन प्रसादाची सोय.
३. स्वच्छता गृहे: मंदिर परिसरात भाविकांना स्नानासाठी गरम पाण्याची सोय.
४. खत निर्मिती: मंदिर परिसरातील निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प.

२) गणेशभक्त योगी श्रीमोरया गोसावी या दूरदर्शन मालिकेची निर्मिती.
३) प्रकाशने: चिंचवड देवस्थान ट्रस्टने खालील पुस्तके / ग्रंथ व सीडीज प्रकाशित केलेली आहेत.

१. श्रीमोरया गोसावी यांचे ओवीबद्ध चरित्र
२. योगिराज श्रीचिंतामणी महाराज चरित्र
३. महासाधू मोरया गोसावी चरित्र आणि परंपरा (लेखक डॉ. कॄ. ज्ञा. भिंगारकार)
४. सद्गुरु श्रीमोरया गोसावी, श्रीचिंतामणी महाराज, श्रीनारायण महाराज, श्रीधरणीधर महाराज यांच्या पदांचा गाथा
५. सद्गुरु श्रीमोरया गोसावी (लेखक विघ्नहरी भालचंद्र देव - महाराज)

सीडीज:

१. माझ्या मोरयाचा धर्म जागो
२. श्रीगणेश गीता
३. सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
४. आरती संग्रह

४) चिंचवड येथे गुरुकुल पद्धतीने वेदपाठशाळा

मंडळातील प्रमुख पट्टाधिकारी

श्री धुंडिराज महाराज देव (ओझरकर) १८८६ ते १९२३
श्री धरणीधर उर्फ तात्या महाराज देव (रावेतकर) १९२३ ते १९३६
श्री चिंतामणि उर्फ बाबामहाराज (सिद्धटेककर) १९३६ ते १९५५
श्री वक्रतुंड महाराज देव (औंधकर) १९५५ ते १९५७
श्री गजानन महाराज देव (वाकडकर) १९५७ ते १९६४
श्री धरणीधर तथा भाऊ महाराज देव (सिद्धटेककर) १९६४ ते १९८१
श्री विघ्नहरी महाराज देव (वाकडकर) १९८१ ते २००१
श्री सुरेंद्रमहाराज देव (सिद्धटेककर) २००१ ते २०१६
श्री मंदार जगन्नाथ देव (पिरंगुटकर - मुख्य विश्वस्त) २०१६ पासून

संस्थानच्या व्यवस्थेसाठी घटने प्रमाणे पाच विश्वस्तांचे मंडळ आहे. त्यापैकी एक नारायण महाराजांच्या घरातील, इतर देव कुटुंबापैकी एक, मोरगाव, सिद्धटेक, थेऊर यांपैकी एक आणि इतर कोणतेही दोन प्रतिष्ठित विश्वस्त असतात.

विश्वस्त:

१. श्री मंदार जगन्नाथ देव (मुख्य विश्वस्त)
२. श्री जितेंद्र रमेश देव
३. श्री आनंद विश्वनाथ तांबे
४. ऍडव्होकेट श्री राजेंद्र बाबुराव उमाप
५. श्री विनोद पोपट पवार

चिंचवड देवस्थान ट्रस्ट मुख्य कार्यालय व पत्र व्यवहारासाठी पत्ता:

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव, पुणे, महाराष्ट्र, ४११०३३.
मोबाईल नं. (24/7) : ७७६८८८११३३
फोन: +९१ ९६०७१०६२६२