Jump to Navigation

वार्षिक कार्यक्रम पत्रिका

वार्षिक कार्यक्रम पत्रिका
शके १९३६
जयनाम संवत्सर
इसवी सन २०१५ - २०१६


स.न.वि.वि.
संपूर्ण वर्षात अनेक प्रसंगी देवस्थानमध्ये देव कुटुंबीयांना आमंत्रण असते. द्वारयात्रा, यात्रा, उत्सव या प्रसंगी यात्रांना, धुपारत्यांना सगळ्यांना निमंत्रण असते. प्रसादाला घरटी एक निमंत्रण असते. कोजागिरी, दशहरा समाप्ती, हळदीकुंकू यावेळी निमंत्रण असते. पूर्वी गावात जवळजवळ वस्ती होती. त्यावेळी प्रत्येक प्रसंगाचे स्वतंत्र निमंत्रण देणे शक्य होते. आता वस्ती दूरवर पांगली. बोलावणे करायला माणूस मिळत नाही. त्यामुळे सर्व बोलावणे एकदमच करीत आहोत. सोबत वार्षिक कार्यक्रम पत्रिका जोडली आहे. आपण सर्वांनी या सर्व प्रसंगाना उपस्थित राहून देवस्थानचे कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडावेत ही विनंती. आपण येत असल्याचे शक्यतो अगोदर कळवावे.

आपला          
श्री मंदार जगन्नाथ देव (महाराज)
चिंचवड देवस्थान ट्रस्ट
चिंचवडगाव, पुणे ४११०३३
मोबाईल नं. (24/7) ७७६८८८११३३
फोन: ०२० ६५३१५७६९, २७६१४६९८


संजीवन समाधी महोत्सव २०१६ आमंत्रण पत्रिका
वार्षिक कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे.
भाद्रपदी यात्रेच्या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.
माघी यात्रेच्या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.


Marathi_text | by Dr. Radut