महाप्रसाद, अन्नदान आणि देणगी

महाप्रसाद:

श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे ही व्यवस्था राबवली जाते. आपणही येथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.

अन्नदान:

श्रीक्षेत्र चिंचवड, श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात अन्नदानासाठी ज्या भाविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी संस्थानाच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.

देणगी:

श्रीक्षेत्र चिंचवड, श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.