श्रीक्षेत्र मोरगाव मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम

दर्शनाच्या वेळा:

सकाळी ५ ते रात्रो १०:०० वाजेपर्यंत

मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम:

सकाळी ५ वाजता - देव उठवणे
सकाळी ५:३० वाजता - पहिली प्रक्षाळ पूजा
सकाळी ७ वाजता - श्री पंचोपचार पूजा नैवेद्य आणि धूपारती
दुपारी १२ वाजता - महापूजा, महानैवेद्य - संस्थानचा असतो
दुपारी ३ वाजता - प्रक्षाळ पूजा, पोषाख
रात्री ८ वाजता - धूपारती, या वेळेस आवरण देवतांची आरती असते.
रात्री ८:३० वाजता - महाआरती
- - धूप दिप नैवद्य आणि मंत्रपुष्प
रात्री १०:३० वाजता शेजारती

प्रत्येक शनिवारी रात्री आरती नंतर अभ्यंग स्नान
प्रत्येक संकष्टीला चंद्रोदय वेळेस विशेष पूजा
दर पंचमीस महाप्रसाद
विजया दशमीस (दसऱ्यास) अलंकार पूजा असते. या दिवशी सर्वांना श्रीमयुरेश्वरास सोने देता येते.

भाविकांसाठी मंदिरातील सोयी व व्यवस्था

आभिषेक:

भाविकांसाठी दर चतुर्थीस देवस्थानतर्फे अभिषेक केले जातात. अभिषेकासाठी संस्थेच्या कार्यालयामधे निधी जमा करुन त्याची पावती दिली जाते. अभिषेक झाल्यावर भाविकांना पोस्टाने प्रसाद पाठविला जातो.

महाप्रसाद:

मंदिराजवळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे ही व्यवस्था राबवली जाते. आपणही इथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.

प्रसादाचे लाडू:

देवस्थान तर्फे प्रसादाचे लाडू मिळतात. काजू, शेंगदाणा व बुंदीचे लाडू उपलब्ध आहेत.

अन्नदान:

अन्नदानासाठी ज्या भाविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.

राहण्याची सोय:

भाविकांसाठी देवस्थानचे प्रशस्त भक्त निवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.

इतर सोयी:

मंदिर परिसरात देवस्थानतर्फे पिण्यासाठी शुद्ध पाण्याची अत्याधुनिक व्यवस्था केलेली आहे. पाण्याच्या मशीन मधून एक रुपयामध्ये एक बाटली शुद्ध पाणी मिळते.

देणगी:

मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.