श्री मयुरेश्वर मोरगाव

Title: 
|| श्री मयुरेश्वर || मोरगाव
₹150.00

पुस्तक परिचय- श्री मयुरेश्वर

पुराणकाला पासून अनंतकाळा पर्यंत भक्तांवर स्वानंदसुखाचा वर्षाव करणारे परम पवित्र क्षेत्र म्हणजे श्री मयुरेश्वर ! किंवा तीर्थक्षेत्र 'मोरगाव'!. या क्षेत्राचा इतिहास, त्याच्या भक्तिमय कथा, आपल्या वैभवासह प्रकट झालेले मंगलमय गणेश स्वरुप, प्रकट झालेल्या देवी-देवता, शुद्धी प्रदान करणारी परिसरातील तीर्थस्थाने, वैभवशाली नित्ययात्रा, द्वारयात्रा व व्रते, हे सर्वकाही अत्यंत अतभुत् आहे. या क्षेत्रात भावभक्तिने प्रवेश केल्याने, किंवा मनापासून केलेल्या थोड्याशा उपासनेने पण इथल्या शक्ती संतुष्ट होऊन अंतरंगातल्या गणेश भक्तिला बळ देतात. आणि पूर्वकर्मांमुळे वाट्याला येणारी विघ्ने दूर होऊन स्वानंदसुखाकडे भक्तांची वाटचाल सुरु होते.

असे हे श्री मयुरेश्वर क्षेत्र संतोष कारक आहे. परम पावन आहे. साधकाला ब्रह्मसुख देणारे आहे. श्रीमुद्गल पुराणात विविध कथांतून सांगितलेले या क्षेत्राचे वैशिठ्य असे की येथे घडलेल्या भक्तिने, पूजनाने, केलेल्या व्रताच्या प्रभावाने, जीवाची पापे नष्ट होऊन त्याला अंती स्वानंद प्राप्ती होते.

अशा सर्व सिद्धिप्रद, पूर्ण योगयुक्त, परम अतभुत्, मयुरेश्वर क्षेत्राचे महत्व "श्री मयुरेश्वर, मोरगाव" या पुस्तकाच्या रुपाने विद्या वाचस्पती प्रा. श्री स्वानंद गजानन पुंड यांनी आपल्या प्रासादिक शब्दातून अथक परिश्रम पूर्वक मांडलेले आहे. या पुस्तकातील मयुरेश्वर क्षेत्राचे वर्णन वाचताना इतिहासाच्या उदरात लपलेल्या अनेक गोष्टी, अनाकलनीय, गूढ, सांप्रदायिक संकल्पना यांच्यावर प्रकाश पडून मयुरेश्वर क्षेत्राच्या दिव्यत्वाची जाणीव होते.

प्रत्येक गणेश भक्ताने आवर्जून वाचण्यासारख्या या ग्रंथात श्री मयुरेश्वर क्षेत्रातील गणेश उपासनांची, प्रथा, पद्धती, देवी-देवता, तीर्थस्थाने, यांची शास्त्रशुद्ध माहिती मिळते. हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता व अभ्यासूंचे त्याबद्दलचे बौद्धिक कुतूहल याची या पुस्तकातील माहितीने पूर्णपणे तृप्ती होते.
या ग्रंथात काय आहे ?
1. श्री मयुरेश्वर क्षेत्राचा पूर्ण इतिहास
2. श्री मयुरेश्वर मंदिरातील प्रत्येक मूर्तीचे अभूतपूर्व वैभव
3. श्री क्षेत्रावर झालेल्या अनेक महान गणपत्याचा परिचय
4. नित्ययात्रा व द्वारयात्रांचा परिचय, प्रत्येक स्थानाची क्रमबद्ध यात्रा, प्रत्येक स्थानाचे सर्वांगीण निरुपण
5. श्री मंदिरातील प्रत्येक बाबींचा विस्मयकारी आढावा
6. श्री मयूरेश्वरांची दिनचर्या
7. श्री क्षेत्राचे वर्षभराचे उत्सव सोहळे
8. तब्बल ७५ स्थानांची सर्वांगीण माहिती
9. या क्षेत्राशी संबंधित विविध महापुरुषांचा परिचय
10. श्री क्षेत्र मोरगाव येथील जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज स्थापित श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री हनुमंत इत्यादी विग्रहाचा इतिहासासह परिचय.
याशिवाय बरेच काही ...

पुस्तकाचे नाव: श्री मयुरेश्वर
लेखक: विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
प्रकाशक: चिंचवड देवस्थान ट्रस्ट
देणगी मूल्य: १५०/-
प्रथम आवृत्ती: गणेश जयंती, ८ फेब्रुवारी २०१९
पुस्तक मिळण्याचे ठिकाण:
श्री क्षेत्र चिंचवड, मुख्य कार्यालय:-
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव, पुणे, महाराष्ट्र ४११०३३.
मोबाईल: ७७६८८८११३३, ९६०७१०६२६२, ई-मेल: chinchwaddeosthantrust@gmail.com

श्री क्षेत्र मोरगाव :
व्यवस्थापक, श्री मयुरेश्वर मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मु. पो. मोरगाव, तालुका बारामती,
जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य, पिनकोड ४१२३०४
फोन: ०२११२ २७९९८६

श्री क्षेत्र सिद्धटेक:
व्यवस्थापक, श्री सिद्धिविनायक मंदिर,
सिद्धटेक (गाव देऊळवाडी), चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. सिद्धटेक, पो. जलालपूर, तालुका कर्जत, जिल्हा, महाराष्ट्र राज्य, पिनकोड ४१४४०३.
फोन: ९४२०९४४७३४

श्री क्षेत्र थेऊर :
व्यवस्थापक, श्री चिंतामणी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. पो. थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२११०.
फोन: ०२० २६९१२३०९

अधीक माहितीसाठी भेट द्या: www.chinchwaddeosthan.org
मोबाईल नं. (24/7) : ७७६८८८११३३
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव, पुणे, महाराष्ट्र ४११०३३