संजीवन समाधी सोहळा ४६० वर्ष २०२१

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव क्षणचित्रे


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा प्रक्षेपण- युट्यूब प्लेलिस्ट

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४६० या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण आपण या युट्यूब लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोरया गोसावी यांच्या समाधी समोर धुपार्ती केली जाते. धुपार्ती साठी झालेली अलोट गर्दी.
युट्यूब लिंक १: https://youtu.be/VDdyXSy9BJA
युट्यूब लिंक २: https://youtu.be/xMQ4atdxTuU


श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुण्यातील नामांकित ढोल-ताशा पथक "श्री गजलक्ष्मी" ने श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरात त्यांची वादन सेवा श्रीमोरया चरणी अर्पण केली.
युट्यूब लिंक: https://youtu.be/inxOWLh5c-I


२४/१२/२०२१ ला श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या पूर्वसंध्येस आर्या आंबेकर यांची विशेष गायन सेवा, श्रीमोरया गोसावी यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव रचित "तुज मागतो मी आता" आणि "पवनेच्या काठी संजीवन योगी" ही गाणी गायली.
युट्यूब लिंक: https://youtu.be/BeMBjWIBXjY


श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी खालील कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या सत्रात डॉ.फाळे व डॉ.रविंद्र कुलकर्णी यांचे सौजन्याने दंत व आरोग्य शिबीर घेण्यात आले. सायंकाळच्या सत्रात जेष्ठ इतिहास तज्ञ श्री.पांडुरंग बलकवडेजीनी "हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देव संस्थान" या विषयावर व्याख्यान दिले. तसेच शास्त्रीय गायक श्री.महेश काळे यांनी त्यांची संगीत सेवा सादर केली. हे संपूर्ण कार्यक्रम आपण चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या YouTube वर पाहू शकता.
युट्यूब लिंक: https://www.youtube.com/channel/UCCC4MEVVMwWeQxQiG9JHwkA


श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खालील कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळच्या सत्रात श्री.राजू शिवतरे यांचे रक्तदान शिबीर व श्री.गजानन चिंचवडे यांचे सौजन्याने नेत्र व दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. सायंकाळच्या सत्रात डॉ.जगन्नाथ दिक्षित यांनी भाविकांचे मार्गदर्शन केले. तसेच सौ.वैशाली भैसने माडे यांनी त्यांची संगीत सेवा सादर केली.
हे संपूर्ण कार्यक्रम आपण चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या YouTube वर पाहू शकता.
युट्यूब लिंक: https://youtu.be/86bg7tYLzC4


श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव वर्ष ४६०, मंगलमुर्ती वाड्यातील पूजा
युट्यूब लिंक: https://youtu.be/jfm1GQzNyl4