श्रीक्षेत्र सिद्धटेक मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम
दर्शनाच्या वेळा:
सकाळी ०५:०० ते रात्रो ०९:३० वाजेपर्यंत
मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम:
सकाळी | ०५:०० वाजता | - देव उठवणे |
सकाळी | ०५:१५ वाजता | - पहिली प्रक्षाळ पूजा |
दुपारी | ११:०० वाजता | - महापूजा, |
दुपारी | १२:०० वाजता | - महानैवेद्य |
रात्री | ०८:०० वाजता | - प्रक्षाळ पूजा |
रात्री | ०८:३० वाजता | - श्रीं ना दूधभात व ओली हरभऱ्याची डाळ यांचा नैवेद्य |
रात्री | ०९:०० वाजता | - शेजारती |
रात्री | ०९:३० वाजता | - मंदिर बंद होते |
प्रत्येक संकष्टीला चंद्रोदया नंतर महानैवेद्य होतो, पंचारती होते, नंतर आरती होऊन मंदिर बंद होते.
भाविकांसाठी मंदिरातील सोयी व व्यवस्था :
आभिषेक:
भाविकांसाठी दर विनायकी चतुर्थी आणि संकष्टीस देवस्थानतर्फे अभिषेक घेतले जातात. अभिषेकासाठी संस्थेच्या कार्यालयामध्ये निधी जमा करुन त्याची पावती दिली जाते. अभिषेक झाल्यावर भाविकांना पोस्टाने प्रसाद पाठवला जातो.
महाप्रसाद:
मंदिरात दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे ही व्यवस्था राबवली जाते. आपणही येथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.
प्रसादाचे लाडू:
देवस्थानतर्फे प्रसादाचे लाडू मंदिर परिसरातील संस्थेच्या केंद्रावर उपलब्ध आहेत.
अन्नदान:
अन्नदानासाठी ज्या भाविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी संस्थानाच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.
राहण्याची सोय:
भाविकांसाठी देवस्थानचे प्रशस्त भक्तनिवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.
इतर सोयी:
मंदिर परिसरात देवस्थानतर्फे पिण्यासाठी शुद्ध पाण्याची अत्याधुनिक व्यवस्था केलेली आहे. पाण्याच्या मशीन मधून एक रुपयामध्ये एक बाटली शुद्ध पाणी मिळते.
संस्थेतर्फे हवेपासून वीज निर्मिती (पवन चक्की) प्रकल्प आणि सूर्यप्रकाशा पासून (सोलर) वीज निर्मिती प्रकल्प राबवले जातात. यातून तयार होणारी वीज मंदिरासाठी वापरली जाते.
देणगी:
मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.