अहो थेऊर गांव तेथे देव चिंतामणी ॥
अहो नांदे इच्छादानी हो मोरेश्वर ॥१॥
अहो अकळु अवतार देव लंबोदर ।
(अहो) प्रत्यक्ष मोरेश्वर हो नांदतसे ॥२॥
अहो महाउग्रस्थळ राहिले गजानन ॥
(अहो) दीन भक्त जन हो तारावया ॥ ३॥
अहो पाहुन शुध्द स्थळ अवतार निर्मळ ॥
(अहो) भुक्ति मुक्ति तत्काळ होईल तेथे ॥४॥
अहो मोरया गोसावी करी निदिध्यास ॥
(अहो) प्रत्यक्ष विघ्नेश हो हृदयीं त्यांचे ॥५॥
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper