प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो । यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌ । रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो ।
यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌ ।
रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

chinchwad-home-banner-after-img

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज

दक्षिणवाहिनी पवनानदीच्या तीरावर श्रीमोरया गोसावींचे समाधी मंदिर आहे. येथे सदगुरू श्रीमोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. हे एक जागृत देवस्थान आहे. महाराज वर्ष १५६१, शके १४८३ मार्गशीर्ष वद्य षष्ठीला समाधिस्थ झाले. त्यावेळी त्यांचे वय १८६ वर्षाचे होते. श्रीमोरया गोसावी समाधिस्थ झाल्यावर श्रीचिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या समाधीस्थानाच्या वर येईल अशी जागा पाहून गुंफेच्या वरच्या बाजूला सिद्धिबुद्धीसहित श्रीविनायकाची स्थापना केली, जो आज समाधी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे. हे समाधिस्थान जागृत आहे. या समाधीवर शके १५८० विलंबी नाम संवत्सरात कार्तिक शुद्ध चतुर्थीस देवालय बांधण्यास सुरवात झाली. ते बांधकाम पुढील वर्षी आषाढ शुद्ध चतुर्थीस पूर्ण झाले. मंदिराची बांधणी साधी दगडाची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक सभामंडप लागतो. या प्रशस्त सभामंडपापासून आत गेल्यावर श्रीमोरया गोसावींची समाधी आहे.
chinchwad-leave-img-divider
chinchwad-home-bottom-gatha-img

पदांचा गाथा

भवश्रम हरला हो । मोरया देखिला हो ।।

मराठी english