chinchwad-inner-banner-left-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-right-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-mobile-img

चिंचवड सनदापत्रे

श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी चिंचवडकर देवांना चिंचवड गांव इनाम दिल्याची सनद.

श्री छत्रपती शाहू महाराजांनी चिंचवड येथे व्यापारी पेठ वसविण्यासाठी श्री देव चिंचवड यांच्या कौलाप्रमाणे दिलेला कौल (आश्वासन,अभय).

chinchwad-sanadpatra-main-img-04

गणेशपूर चिंचवड रुपया किंवा देव रुपया म्हणून हे नाणे ओळखले जाते. याचे वजन १० ते ११.५ ग्रॅम असून हे चांदीचे नाणे आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांच्या काळात चिंचवड येथे ही टांकसाळ चालू झाली. सदर टांकसाळ चिंचवड देवस्थान आणि पेशवे सरकार यांच्यात भागीदारीत चालविली गेली असा संदर्भ ग्रंथांमध्ये उल्लेख आहे.

इ .स १७६७ पासून ते साधारण १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत येथे सोन्या-चांदीच्या तसेच तांब्याचा पैसा यांचा समावेश होतो. श्री देव कुटुंबीय आणि स्वतः पेशवे हे गणेश भक्त असल्यामुळे सदर नाण्यावर श्री गणेशाच्या हातातील ‘परशु’ बहुदा चिन्हांकित केला असावा. या काळातील इतर नाण्यांप्रमाणे यावरही उर्दू भाषेत मजकूर आढळतो.

यावर दिल्लीच्या तत्कालीन बादशहाचे नाव (शाह आलम दुसरा उर्फ शाह अली गोहर) नमूद केलेले आहे. यावरून या नाण्याचा कालखंड लक्षात येतो. या नाण्यांसाठी वापरण्यात आलेल्या धातूचे गुणवत्तेच्या दृष्टीने पेशवे कालखंडातील उत्तम नाण्यात याची गणना होत असे.

भारत सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या “Maratha Mints & Coinage” या पुस्तकात चिंचवडच्या टांकसाळ्याचा उल्लेख “चिंचूर” म्हणून आढळतो.

छत्रपती शाहू महाराजांनी चिंचवडकर श्री देवांना चिंचवड गावची दुतर्फा इनामाची सनद.

chinchwad-leave-img-divider
मराठी english