आरती आरती बुधवारची

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥
अगम्य गम्य रूप आनंदघन ॥
मयुरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥
ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥

जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥
आदि पुरुषा भाळी चंद्र त्रिनयना ॥
कृपा अमृतघन भवताप शमना ॥
उजळू अष्टभावे आरति तव चरणा ॥१॥

सहस्रवदने शेष वर्णिता झाला ॥
न कळे तुमचा महिमा स्तवितां श्रमला ॥
मौन धरुनि वेद श्रुति परतल्या ॥
तोचि (हाची) विश्‍वंभर मोरेश्‍वर अवरतला ॥२॥

कोटि सूर्यप्रकाश कोटि (शशि) निर्मळ ॥
सर्वात्मा सर्वां जीवी जिव्हाळा ॥
मोरया गोसावी पाहे अवलीला ॥
देव भक्‍त प्रेमे घेती सोहळा ॥३॥

divider-img