आरती आरती मंगळवारची

चिंतामणी परिपूर्ण देवाधिदेव ॥
ब्रम्हांडी माया ही रचिली त्वां सर्व ॥
प्रपंच सुखदु:ख तुझें वैभव ॥
अखिल जन नेणती हा गुह्य भाव ॥१॥

जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांती ॥
जयदेव ॥

निगमागम वर्णिता नकळेचि पारु ॥
भक्‍त जन कृपाळू हा मोरेश्‍वरू ॥
साधुपरिपालना धरीला अवतारू ॥
निर्विकल्प सेवा हा कल्पतरू ॥
जयदेव०॥२॥

शंकर जनक ऐसी पुराणे गाती ॥
परिसकळांचा जनिता हा मंगलमूर्ती ॥
अगाध याचा महिमा नकळे कल्पांती ॥
थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्ति ॥
जयदेव०॥३॥

निजभावें पूजन आरतियुक्‍त ॥
खिरापती नाना फळे अणिति भक्‍त ॥
एक आरति करिती पूजन नित्य ॥
निंद्क कपटीबुध्दि ठेकले बहुत ॥
जयदेव०॥४॥

मोरया गोसावी भक्‍त किंकर ॥
थोर भाग्य (पुण्य) माझें हा मोरेश्‍वर ॥
निंदक कपटी बुध्दि निणति हा पार ॥
गोसावी न म्हणावा हा मोरेश्‍वर ॥
जयदेव०॥५॥

विरक्‍त साधुशील नेणति कुसरी ॥
महानुभावामध्ये अगाध ही थोरी ॥
सर्वांभूती भजन समावैखरी ॥
पाहति ही पाऊले धन्य संसारी ॥
जयदेव०॥६॥

भक्‍तराम म्हणे मोरेश्‍वरमूर्ति ॥
नित्यानंद शरण कल्याण कीर्ति ॥
तोडिसी मायाजाळ संसार भ्रांती ॥
अंत किती पाहसी नागाननव्यक्‍ती जयदेव ॥७॥

divider-img
मराठी english