आरती आरती शुक्रवारची

सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्ती ॥
चित्तातीत होऊनि अनुभव भोगिती ॥
स्वानंद अनुलक्ष्य लक्षती सद्‍अवृती ॥
व्यक्‍ताव्यक्‍तरूपी जय ब्रम्हामूर्ति ॥
जयदेव जयदेव जय विद्याधीशा ॥
अनुभव पंचारतीं ओवाळू धीशा ॥
जयदेव ॥
ध्रु०॥

सृष्टीमाजि लोक बोलती गौरीज ॥
पाहता केवळ ब्रम्ह अवतरले सहज ॥
म्हणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥
ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥
जयदेव०॥२॥

सकळा देवांमाजि तू वक्रतुंड ॥
दोषच्‌छेदन कामी होसी प्रचंड ॥
ध्यानी अवलोकिता पूर्ण ब्रम्हांड ॥
शास्त्रादिक शोधिता निगमागम कांड ॥
जयदेव०॥३॥

सुखसाधन मनमोहन फणिभूषणधारी ॥
हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥
मयूरवाहन पावन नयन – त्रयधारी ॥
सादर वरद भक्‍ता होय विघ्नहारी ॥
जयदेव०॥४॥

गुरवरकृपा-योगे दिसे अभेद ॥
पाहतां सर्वांठायी हा मूळकंद ॥
पठण करितो योगी निज चतुर्वेद ॥
विनवी चिंतामणी निजभावे वरद ॥
जयदेव०॥५॥

divider-img
मराठी english