आरती आरती शेवटची

(या आरतीचे वेळी श्रीमहाराज यांनी पंचारती ओवाळावयाची असते)

झाली पूजा उजळू आरती ॥
भक्‍तिभावें पूजा करु विघ्नेशी ॥
पूजेचा आरंभ करितो कुसरी ॥
कैसी पूजा तुझी न कळे अंतरी ॥१ ॥
जयदेब जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
भक्‍तिभावे तुझे चरण ह्रदयी ॥
जयदेव ॥ध्रु०॥

उजळिले दीप मनोमानसी ॥
सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥
पूर्व पुण्य माया रचिली कुसरी ॥
भक्‍तिभावें तुज धरिले अंतरी ॥
जयदेव०॥ २ ॥

प्रपंचाची गती न कळे लौकिकी ॥
किती भोग भोगू विपरीत ध्याती ॥
म्हणुनी तुज शरण येतो (आलों) प्रतिमासी ॥
ऐसा भक्तिभाव निरोपी तुजसी ॥
जयदेव० ॥ ३ ॥

समर्थासी बोलणे नकळे मतीसी ॥
ऐसा सदोदित देखिला भक्‍तिसी ॥
मोरया गोसावी म्हणे तुजसी ॥
टाकिले वनवासी कणवाचे व्दारी ॥
जयदेव०॥ ४ ॥

अर्चन करूनि तुम्हा केली आरती ॥
सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
भक्‍तिभावें तुझे चरण ह्रदयी ॥
जयदेव जयदेव ॥५॥

divider-img
मराठी english