पदे पद ११

एक भाव धरुनि जाई तूं प्राण्या ॥
शरण जाई गजानना ॥
भवदु:ख तुझे होई नाशना ॥
मग मुक्तिपद जोडियेले ॥१॥

संसारा येउनी काय त्वां केले ॥
गणराजपाय अंतरले ॥
काय त्वां प्राण्या जोडियेले ॥
सारे तुझे जिणें वायां गेलें ॥२॥

माझें माझें करितां ठकलासि मूर्खा ॥
कोण तुज सोडवील दुःखा ॥
नाम एक तारील फुका ॥
उध्दरिले देखा कर्मसंगें ॥३॥

आपुले हितां तूं कारण ॥
एकनिष्ठ धरूनि मन ॥
वेगें तुझें होईल कर्मछेदन ॥
मग जन्म मरण नाहीं तुज ॥४॥

ऐसा एकजना उपदेश केला ॥
गणराज पायीं लक्ष तुम्ही लावा ॥
चिंतामणी म्हणे स्वामी माझा सेवा ॥
नाही तुम्हा भय यातायाती ॥५॥

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४