पदे पद १२

आम्ही मोरयाचे वेडे नेणती ॥
वेडे बागडे नाम तुझें गाऊं देवा ॥
मोरयाचे वेडे नेणती ॥१॥

एक वर्णिती नानापरी ॥
आम्ही म्हणो मोरया तारी देवा ॥
मोरयाचे वेडे नेणती ॥२॥

एक वर्णिती नाना छंद ॥
आम्ही म्हणो शुध्द अबध्द देवा ॥
मोरयाचे वेडे नेणती ॥३॥

मोरया गोसावी तुझे वेडे ॥
रंगी नाचू लाडे कोडे देवा ॥
मोरयाचे वेडे नेणती ॥४॥

divider-img