पदे पद १६

लिंबलोण

अहो स्वानंदपुरीचा अहो रहिवासी आला ॥
अहो आम्हासी भेटला मोरेश्वरीं ॥१॥

अहो मूर्ति गोजिरवाणी अहो सेंदूर साजिरी ॥
अहो सिंहासनावरी मिरवतसे ॥२॥

अहो कोटिकंदर्पांना ओवाळुनी टाका ॥
अहो सिध्दीच्या (बुध्दीच्या) नायका वरोनियां ॥३॥

अहो याच्या बिरुदाचा ॥
त्रैलोकि दणाणा ॥
अहो पतितपावन नाम गर्जे ॥४॥

अहो (माझ्या) वडिलांनी जोडी जोडी केली ह्या (चरणाची) पायाची ॥
अहो हीच हो आमुची कमधेनू ॥५॥

अहो याजवीण आम्हा ॥
अहो अन्य नसे कोणी ॥
अहो मच्छिया जीवन तैशापरी ॥६॥

अहो मोरया मझी लज्जा रक्षी ।
अहो सर्वही दीनानाथा ॥
अहो तुजवीण आम्हा कोण आहे ॥७॥

अहो महाद्वारी उभा कर जोडुनिया ॥
अहो भक्‍तिदान मोरया दे‍ई मज ॥८॥

अहो मोरया गोसाव्यांच्या वंशीचा किंकर ॥
मागे निरंतर हेंचि सुख ॥९॥

divider-img
मराठी english