पदे पद १७

उद्धरिले जीव तुज येती हो शरण |
कष्टलीस (श्रमलीस) माते तू हो भक्ता कारण ||
येई हो गजानन || माझ्या मनाचे मोहन ||
येई हो गजानन || माझ्या जिवाचे जिवलग ||
येई हो गजानन ||१||

भाद्रपद मास आला भक्ता उल्लास जाहला ||
कधीं तुज देखेन मी आपुले डोळां ||
येई हो गजानन ||

बहुत कष्टलो संसारीं ||
यावें गजानन ||

माते न लावावा उशिर ||
यावें गजानन ||२||

दुष्ट भोग आहेत हो या हो प्रपंची ||
सोडवी आतां मज तूं हो चुकवी यातायाती ||
यई हो गजानन || माझ्या मनाचे मोहन ||
येई हो गजानन || माझ्या जिवाचे जिवलग || येई हो गजानन ||३||

सत्यलोक टाकुनियां येथे रहिवास धरिला ||
तूं हो कृपाळू (दयाळू) माउली थोर नवलाव केला ||
येई हो गजानन ||
बहुत कष्टलों संसारीं ||
यावें गजानन ||
माते न लावावा उशिर ||
यावें गजानन ||४||

माझिया धावण्या माते धावेग लवकरी ||
कष्टलीस भारी ग माझी सांडी न करी ||
येई हो गजानन ||
माझ्या मनाचे मोहन ||
येई हो गजानन || माझ्या जिवाचे जिवलग ||
येई हो गजानन ||५||

सोडवण माझी तूं हो येई ग मयुराई ||
कैसा देह ठेवूंग (मी) आतां करूं मी कांई ||
येई हो गजानन ||
बहुत कष्टलों संसारीं ||
यावें गजानन ||
माते न लावावा उशिर ||
यावें गजानन ||६||

जळावीण मीन जैसा भूमी ग तळमळी ||
तैसा तुजवीण ग माझा देह हळहाळी ||
येई हो गजानन माझ्या मनाचे मोहन ||
येई हो गजानन || माझ्या जिवाचे जिवलग ||
येई हो गजानन ||७||

ब्रह्मयाने ध्यान तुझे केले हो दृढता ||
वर दिला माते ग सृष्टि झाला करीता ||
येई हो गजानना ||
बहुत कष्टलों संसारीं ||
यावे गजानन ||
माते न लावावा उशिर ||
यावें गजानन ||८||

शेषा भार बहुत झाला हो पृथ्वीचा ||
कृपा (दया) केली माते ग भार झाला पुष्पांचा ||
येई हो गजानन || माझ्या मनाचे मोहन ||
माझ्या जिवाचे जिवलग ||
येई हो गजानन || येई हो गजानन ||९||

भाद्रपद मास आला द्वारें करिती हो नरनारी ||
तूं हो कृपाळू (दयाळू) माउली इच्छा देसी ग लवकरी ||
येई हो गजानन ||
बहुत कष्टलों संसारी ||
यावें गजानन ||
माते न लावावा उशिर ||
यावें गजानन || १०||

आतां एक म्हणे माझी विनंती ऐकावी ||
म्हणतसे तुज भक्ति आपुली द्यावी ||
येई हो गजानन माझ्या मनाचे मोहन ||
येई हो गजानन ||
माझ्या जीवाचे जिवलग ||
येई हो गजानन ||११||

चिंतामणी दास रंक विनवी हो एकभावें ||
कृपा (दया) करी माते ग माझ्या हृदयीं राहावें ||
येई हो गजानन ||
बहुत कष्टलों संसारीं ||
यावें गजानन ||
माते न लावावा उशिर ||
यावें गजानन ||
येई हो गजानन || १२||

divider-img
मराठी english