अतिकाळ झाला येथे ॥
मूळ पाठवी लवकरी ॥
प्राण माझा स्थिर नाही ॥
अहो आणिक एक नवल झाले ॥
विपरीत देखिले स्वपन ॥
निर्गुणरूप सदोदित ॥
मूर्ति देखिल (पाहिली) मनोमय ॥
विस्मित झाले मन माझे ॥
नोळखे भ्रांतीचा समावेश ॥
भेट देई वरदमूर्ति ॥
अहो जय जय जय विघ्नराजा ॥१॥
पूर्व जन्म रे (जन्मीचे) संचित ॥
प्रारब्धाची कोण गती ॥
देव (मोरया) भेटला अवचित ॥
अहो जय जय जय विघ्नराजा ॥ध्रु०॥
अहो आणिक एक नवल झाले ॥
सकळा देवांचे एकरूप ॥
मन माझे स्थिर नाही ॥
कोठे (पहावा) ओळखावा हा देव ॥
भ्रांतिरूप शरीर माझें ॥
विषय करिती चेतना ॥
मन माझे पांगुळ हो ॥
अहो जय जय जय विघ्नराजा ॥२॥
अहो ऐसे देवा काय केले ॥
उदंड गाइले स्वपन ॥
प्रपंचाची कोण गती ॥
सूत्रधारी रे कवित्व करी ॥
नेणती बा कोणी देही ॥
वेगी (मूळ) पाठवी लवकरी ॥
मुळविण नये बापा ॥
अहो जय जय जय विघ्नराजा ॥३॥
मोरया गोसावी अवधारी ॥
विनंती माझी परीस देवा ॥
सुख पावलो भक्तीचे ॥
भक्तीलागी कृपा करी ॥
ऐसे संचित पूर्वीचे ॥
निर्माण तूचि जाणा ॥
कृपा (दया) करावी लवकरी ॥
वेगीं मूळ पाठवावें ॥
अहो जय जय जय विघ्नराजा ॥४॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper