प्रथम आरंभी ध्यातो चिंतामणि देव ॥
रहिवास मूळ गंगे ॥
कैसा सभवता हा वेढा ॥
जळचरे उल्हास देती ॥
मुक्ति द्यावया रहिवास ॥ जय जय विघ्नराजा ॥१॥
उग्र रूप रे स्वामी तुझे अरण्यात वास तुझा नाम चिंतामणि देव जय ॥ध्रु.॥
अहो सभवती तीर्थे भारीऽ ॥
पूर्वभागी रे सिद्धेश्वर प्रकट झाली भागीरथी ॥
तीर्थे काय रे वर्णू आता ब्रह्महत्या निरसती ॥ जय ॥२॥
अहो दक्षिण भागीं मोहनमायाऽ माता कृपाळू (दयाळू) जननी ॥
समस्ता मोक्ष देती ॥
रहिवास रे देवापाशीं ॥ जय ॥३॥
अहो पश्चिम भागी तीर्थ थोरऽ ॥ जग ध्याती रे मोहनमाया ॥
समस्ता सिद्धी देती ॥ प्रकट झाली रे मोरेश्वरी ॥
काय वर्णूं उत्तर भागी ॥ जननी (माता) खेळती कल्लोळी ॥
माता ते मोहनमाया ॥ समागमे रे ब्रह्मचारी सकळिक मिळोनिया ॥
ध्यातो चिंतामणी देव आरती उजळोनी ॥ छंदे नाच रे (आनंदे नाचे) गौरीबाळ मोरया गोसाव्याने ॥
चरण (पाय) धरिले देवाचे ॥ नुपेक्षिया भक्तालागी ॥ अहो जय जय जय विघ्नराजा ॥४॥
(चिंचवडला पहिल्या द्वारयात्रेतून परतताना आणि बहुतेक मोठ्या धुपारत्यांना या पदाने सुरवात करावी.)
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper