पदे पद २०

बाळसंतोष (मोरया गोसाव्यांचा)

आम्हा एकदा मोरेश्वरा ॥
दान देई तू सत्वर ॥
बाबा बाळसंतोष ॥
निरसी दुष्ट (दुस्तर) हा संसार ॥
बाबा बाळसंतोष ॥१॥

प्रपंचि शिणलो बहुत देवा ॥
काही न घडे तुझी सेवा ॥
बाबा बाळसंतोष ॥

ऐसा अपराधी मी देवा ॥
बाबा बाळसंतोष ॥२॥

ऐसा अपराधी मी तुझा जन्मोजन्मी ॥
नाही घडले रे स्मरण नामी ॥
बाबा बाळसंतोष ॥

नको कोप रें धरूं स्वामी ॥
बाबा बाळसंतोष ॥३॥

तुजविण नाही देव दुजा ॥
हेचि सत्य रे गणराज ॥
बाबा बाळसंतोष ॥

चुकवी भव रे मायापाश ॥
बाबा बाळसंतोष ॥४॥

भवसागर तरावया ॥
उपाय नाम हे मोरया ॥
बाबा बाळसंतोष ॥

करी मज रे पूर्ण दया ॥
बाबा बाळसंतोष ॥५॥

तुझे दयेवीण जन्म काय ॥
जैसा प्राण रे विण देह ॥
बाबा बाळसंतोष ॥

माझा देह रे लावी सेवे ॥
बाबा बाळसंतोष ॥६॥

जरी देवराया कृपा करिसी ॥
मग सार्थक जन्मासी बाबा बाळसंतोष ॥
नको चाळवू जीवासी ॥
बाबा बाळसंतोष ॥७॥

माझे पदरीं नाही पूर्वसंचित ॥
पुरवी माझे रे मनोरथ ॥
बाबा बाळसंतोष ॥

तुझे नाम रे दीननाथ ॥
बाबा बाळसंतोष ॥८॥

दीननाथ नाम हे सत्य करावें ॥
दीनरंक रे उद्धरावे ॥
बाबा बाळसंतोष ॥

आपुले प्रेम रे मज द्यावे ॥
बाबा बाळसंतोष ॥९॥

तुझे प्रेम जया लाधले ॥
ते हो संसार चुकले ॥
बाबा बाळसंतोष ॥

त्यासी पुन्हां रे नाहीं येणें ॥
बाबा बाळसंतोष ॥१०॥

मोरेश्वरा तूं माझें सर्व तप जाण ॥
न सोडी तुझे बा चरण ॥
बाबा बाळसंतोष ॥

ऐसा निश्चय सत्य जाण ॥
बाबा बाळसंतोष ॥११॥

म्हणोनिया प्रेम द्यावें झडकरी ॥
दास मोरया विनंती करी ॥
बाबा बाळसंतोष ॥

दीनरंका रे (रंक दीनासी) उद्धरी ॥
बाबा बाळसंतोष ॥१२॥

बाबा बाळसंतोष ॥
बाबा बाळसंतोष ॥
बाबा बाळसंतोष ॥

दीनरंका रे (दीनरंकासी) उद्धरी ॥
बाबा बाळसंतोष ॥

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४