पदे पद २१

अहो कलियुगामाजी एक ॥
मयूर क्षेत्र बा ठाव ॥
अहो मोरेश्वर दाता जाण ॥
दीनरंकेचा राव ॥

अहो एच्छिले फळ देतो आहे ॥
मोक्षपद ऊपाव ॥ १ ॥

माझ्या मोरयाचा (मोरोबाचा) धर्म जागो ॥ ध्रु. ॥

अहो चौऱ्यांशी बा लक्षगांव ॥
पंथ अवघड भारी ॥

अहो तितुकाही उल्लंघूनी ॥
वास केला मयूरपुरीं ॥

अहो चुकतील यातायाती ॥
तरतील भवसागरी ॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥ २ ॥

माझा मोक्षदाता तूंचि एक म्हणूनी शरण रिघालों ॥

अहो कलवृक्ष देखोनियां ॥
परम सुख पावलों ॥

अहो विश्रांती बा थोर झाली ॥
भक्तिदान लाधलों ॥
मा. मो ॥ ३ ॥

माझा देह हा पांगुळ हो ॥
बापा आलो तुझिया ठाया ॥

अहो कृपा (दया) दृष्टी पाही मज ॥
शरण तुझिया पायां ॥

अहो कृपाळू (दयाळू) बा तारी वेगीं ॥
भक्त (दीन) वत्सल देवराया ॥
माझ्या मो. धर्म जागो ॥ ४ ॥

अहो अनंत रुपें अनंत नामें ॥
तेथें वर्णावे (बोलावे) काय ॥

अहो योगियांचा निदिध्यास ॥
मोरया गोसावी ध्याये ॥

अहो युगानुयुगी जोडी झाली ॥
विघ्नहराचे (मोरेश्वराचे) पायी ॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥

याचे चरणी लक्ष लागो ॥
याची सेवा मज घडो ॥
याचे ध्यान हृदयीं राहो ॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥ ५ ॥

divider-img
मराठी english