पदे पद २२

भवश्रम हरला हो ।।
मोरया देखिला ही ।।
भवश्रम हरला हो ॥ ध्रु.॥

नयनीं अवचित भासला ||
अंगी चंदन चर्चियेला ॥१॥

आला लवलाही धावोनी ।।
भेटी दिधली आलिंगोनी || २ ||

शुंडा दंड उभारिला ।।
नाभी नाभीसी बोलिला ॥ ३॥

असुरभंजन मोरेश्वरा ||
भक्तजना वज्रपंजरा || ४ ||

मोरया गोसावी दातार विघ्न-अंतक मोरेश्वर (मायबाप) ||५||

divider-img