पदे पद २४

वाट मी पाहतों रे (देवा) मोरया रे तुझी ॥
तूंचि विश्रांती रे माझिये मायबापा ॥१॥

तुजवाचोनी सोय रे मज नाहीं रे दुसरी ॥
झणी धरिसी अंतर हो (दीन) नाथ बंधु ॥२॥

भेटी बहु दिवस जाहले देव कोठे स्थिरावले ॥
(वाट) पाहतां श्रमले हो नेत्र माझे ॥३॥

चरणी ब्रीदाचा तोडरू रे हा तुझा हो बडिवारू ॥
(माझा) देहभाव निर्धार हा तुझे पायी ॥४॥

मोरया गोसावी हो योगिया हो लीन ॥
भेटी दिधली आलिंगुनिया गणराजा (महाराजा) ॥५॥

divider-img