विनवितो तुजप्रती परिसे मंगलमूर्ति ॥
दीन मी बहुत गांजलों ॥
टाकिले वनवासी निष्ठुर झालासी मन झालें दुश्चित्त कृपेचा सागरू भक्ताचा दातारू अनाथाचा नाथ होसि ॥
कष्टविले (श्रमविले) मज या रे प्रपंची ॥
म्हणूनिया स्मरण तुमचें हो देवा ॥१॥
टाकिले वनवासीं यातना देहासी ॥
होत असे मज फार ॥
न पाहे अंतर न धरावें उदास मी रे बहुत श्रमलो ॥
काकुलती येतों तुज मी देवा ॥
मज नाहीं विसावा ॥
पुण्य नाही माझें ग्रंथीसी फार म्हणूनि का धरिलें अंतर हो देवा ॥२॥
न विचारी गुणदोष लावुनि कासेसी ॥
उतरी देवा पैलथडी ॥
संसार सागरी बुडतों भारी ॥
विषयी झालों आसक्त ॥
माया ही सर्पिणी१ न सोडी क्षणभरी ॥
पीडिती बहुत शरीरीं ॥
इजलागी उतार तुझे स्मरण ॥
(मोरया) तेणेम होईल दहन हो ॥३॥
येऊनि गर्भवासी व्यर्थ श्रमलो ॥
कांही सार्थकचि नोहे ॥
स्नेह लागला पुत्रकलत्री ॥
वाटती माझी सखी ॥
सत्कर्मे टाकुनि यांचे कारण ॥
भ्रांति पडली माझ्या देहीं ॥
मायेचें पडळ (तोडी) काढी लवकरी ॥
(पाया) चरणा वेगळे न करी दुरी हो (मोरया) ॥४॥
मनवृत्ति माझी होती चंचळ ॥
इस करी बंधन ॥
बंधन करी तूं आपुले चरणी ॥
न जाय क्षण एक भरी ॥
दास चिंतामणी विनवी चरणीं ॥
राहिन मी तुझे पायीं ॥
आणिक ठायासी मज नाही रे गोडी ॥
म्हणोनिया चरण न सोडी हो देवा ॥
म्हणोनिया पाय न सोडी ॥५॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper