पदे पद २६

मोरया तैसे माझें मन (अरे) तुज कारण ॥
मोरया हो तैसे माझे मन ॥ ध्रु.॥

घन देखुनि अंबरी ॥
कैसा आनंद मयूरा रे ॥ १॥

भानू असतां मंडळी ॥
प्रीती विकासिती कमळे रे ॥
मो ० ॥२॥

मेघ वर्षे भूमंडळी ॥
हर्षे बोभाया चातका रे ॥
मो०॥ ३॥

शशि देखुनि चकोर ॥
तृप्ती पावति अंत:करणीं रे ॥
मो०४॥

बापा जळाविण मीन ॥
जैसा तळमळी मानसी रे ॥
मो० ॥५॥

बापा कुसुमा वेगळा रे ॥
भ्रमर विश्रांति न पावे रे ॥
मो० ॥६॥

बापा तनुमन विश्रांत ॥
मज नावडे घरदार१ रे ॥
मो० ॥७॥

मोरया गोसावी मानसी ॥
तुज ध्यातो विघ्नहरा रे ॥
मोरया तैसें माझें मन ॥
मो ० ॥८॥

divider-img
मराठी english