पदे पद २८

अहो गजानन माझा आहे मोरेश्‍वरी ॥
अहो तोचि तो पाहिला हो आजि डोळां ॥१॥

अहो भाद्रपद मास शुध्द चतुर्थीसीं ॥
अहो आनंदले भक्त हो येति तेथें ॥२॥

अहो तया भक्तांमाजी मोरया गोसावी ॥
अहो आणिक दुसरा हो भक्त नाही ॥३॥

अहो देव भक्त तोही एकची हो जाणा ॥
अहो हें गुह्य कवणा हो कळेना हो ॥४॥

अहो चिंतामणी देव तैसें तेंही रूप ॥
(अहो) त्यासी तोचि भेद हो नाहीं जाणा ॥५॥

अहो आनंदे गर्जती मोरया म्हणती ॥
अहो यात्रेंसीं हो जाती हो भाद्रपदीं ॥६॥

आहे भाद्रपद मास शुध्द हाचि पक्ष ॥
अहो चतुर्थीसी थोर हो आनंद हो ॥७॥

अहो ब्रह्मादिक देव शिव विष्णु तेहि ॥
अहो सकळिक येती हो आजि तेथें ॥ ८॥

अहो मोरया गोसावी चिंचवडी आहे ॥
(अहो) प्रतिमासी जाई हो मोरेश्वरा ॥९॥

अहो यात्रेचा आनंद न माये गगनीं ॥
(अहो) देव भक्त पाहे हो आजि डोळा ॥ १०॥

अहो देव भक्त तेहि तेथेंचि पहावे ॥
अहो आनंदें गर्जती हो मोरया हो ॥११॥

अहो ऐसें तेंचि सुख चिंतामणी मागे ॥
अहो समर्था तूं देई हो क्षणमात्रें ॥१२॥

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४