सुखे नांदत होते मी संसारी हो ॥
तव अवचित झाले (येणे) परी हो ॥
मज हो संचार झाला ये शरीरी हो ॥
मज नेउनी घाला मोरेश्वरी हो ॥
बाई ये हो (सुंदरे) हो दैवत लागले मोरगांवींचें ॥१॥
अहो उतरू न शके कोणी साचें ॥
बाई ये हो देवत लागलें मोरगावींचें ॥
अहो सकळिक म्हणती झाली झडपणी हो ॥
बोलवा पंचाक्षरी करा झाडणी हो ॥२॥
अहो मंत्र रक्षा न चले येथे काहीं हो ॥
देह भाव गुंतला मोरया (देवा) पायी हो ॥ ३॥
माझे तनुमन गुंतले मोरया पायी हो ॥
नेणती बापुडी करिती जाचणी हो ॥ ४॥
अहो दास तुझा मोरया हो (गोसावी) हो ॥
या हो मोरया वेगळें नेणें कांहीं हो ॥५॥
हे पद सर्वसाधारणपणे पौर्णिमा अमावस्या या दिवशी म्हणावे.
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper