मोरया मोरया हो मोरया मोरया मोरया मोरया ।
मोरया मोरया हो मोरया हो ॥
माझे मोरया मोरया हो मोरया हो ॥
दैव केले डोळा हो पुण्य केले पायी ।
माझ्या मोरयसि बाही हो आलिंगीन ॥१॥
अहो देवाचिया नरा हो बुद्धि केली लाटी ।
माझ्या मोरयासि दृष्टी हो देखिलिया ॥२॥
अहो सेंदुर वर्णिला हो जयाच्या रे माथा ।
अहो तया गणनाथा हो नमन माझे ॥३॥
अहो भागलों कष्टलों हो आलों मोरेश्वरा ।
अहो आलों मोरेश्वरा ॥
त्याचे घरी डेरा हो अमृताचा ॥४॥
अहो भादवे चौथिसी हो जे द्वारे करीती ।
अहो ते फळ पावती हो अभिलाषीचे ॥५॥
अहो मायबापाहुनी हो मोरया आगळा ।
अहो न करी वेगळा हो जीवाहुनि ॥६॥
अहो मायबापाहुनि मोरया परी हे ।
(लिंब) लोण मी घडिये हो उतरीन ॥७॥
अहो कऱ्हेच्या पाठारी हो नांदे इच्छादानी ।
अहो नाम चिंतामणी हो मोरेश्वर ॥८॥
मोरेश्वर देव हो कमंडलू गंगा ब्रह्मकमंडलू गंगा ।
अहो पापे जाति भंगा हो देखलिया ॥९॥
अहो कनकाचा परियेळु हो उजळू दीपका ।
भावे (जिवे) ओवाळू नायका हो मोरेश्वरा ॥१०॥
अहो शंक भेरी तुरे हो वाजती काहाळा ।
(माझ्या) होतसे सोहळा हो मोरयाचा ॥११॥
अहो हाती पंचारती हो हरिदास नाचती ।
अहो भावें (जिवे) ओवाळिती हो मोरेश्वरा ॥१२॥
अहो दुरूनि दिसती हो पांढरीया ध्वजा ।
अहो तेथे नांदे राजा हो मोरेश्वर ॥१३॥
अहो यादवांचा हिरा हो आला माझे घरा ।
(नव) रत्नांचा डोलारा हो लांबविला ॥१४॥
(चिंचवडच्या तिसऱ्या द्वारयात्रेतून परतताना आणि गोकुळाष्टमीला य पदाने सुरवात करावी.)
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper