पदे पद ३४

पाहतां त्रिभुवनी हो दुजा न देखो नयनी ।
एका मोरया वाचूनि हो मोक्षदाता ॥१॥

अहो येई तूं मोरया हो त्रैलोक्यविसावया ।
जडजीव तारावया हो तूंची (हाची) एक ॥२॥

अहो अकळु नकळू बा आहेसी सत्यलोकीं ।
नवल अवतार मृत्युलोकी त्वां धरीयेला ॥३॥

अहो मूषक – वाहन हो देव देखिले गहन ।
महाविघ्नविध्वंसन हो गणराज (मायबापा) ॥४॥

अहो परशु अंकुश करी बा घेउनियां झडकरी ।
आपुले ब्रीद साच करी हो गणराज (महाराज) ॥५॥

अहो मोरया गोसावी हो मोरया गोसावी देव योगिया गहन ।
त्यांचे (यांचे) हृदयी संपूर्ण हो नांदतसे ॥६॥

divider-img
मराठी english