पदे पद ३५

गणराज दयाळा बा गणराज दयाळा मज दाखवी चरण ।
माझे भुकेले लोचन हो पाहावयासी ॥१॥

अहो धेनू जाय वना बा वाट पाहे वत्स सदना ।
तैसी गत माझ्या मना हो झाली असे ॥२॥

अहो अजूनि कां न येसी बा सखया गणराजा ।
कवण्या भक्ताच्या (दासाच्या) या काजा हो गुंतलासी ॥३॥

अहो दूर धरिसी मजसी (देवा) आठवावे कवणासी ।
मिठी मारली चरणासी (पायासी) हो दृढभावें ॥४॥

विनवावें तुज किती बा (देवा) सखया मंगलमूर्ति ।
दीन (बाळा) तुज मी काकुलती येत आहे ॥५॥

(टीप: प्रत्येक चरण दोन वेळां म्हणण्याचें आहे.)

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४