अहो माहेर हो माझें ऐका हो सजणी ।
अहो गाईन मी तेही हो वेळोवेळां ॥
अहो सिद्धि बुद्धि माता गणराज पिता ।
(देवा) षडानन चुलता हो आहे मज ॥२॥
अहो आजा महादेव अहो आजी ती भवानी ।
नारद हा मुनि हो मातुळ हो ॥३॥
अहो मातामह माझा हो ब्रह्मदेवजाणा ।
अहो कश्यप हा मामा हो आहे मज ॥४॥
अहो लाभ लक्ष दोन्ही बंधू हे साजिरे ।
अहो काशिराज तिसरा हो आहे मज ॥५॥
अहो भ्रूशुंडि हे ऋषि (देवा) मुद्गल महामुनि ।
अहो मोरया गोसावी हो भक्त जाणा ॥६॥
अहो अनंत हे भक्त हो असतिल देवराया ।
तयामाजी सिद्ध हो हेचि जाणा ॥७॥
अहो चिंतामणीदास हो हेचि हो मागत ।
जन्मो जन्मीं हेचि हो देई मज ॥८॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper