पदे पद ४१

प्रथम नमन करूं एकदंता ।।
सकळ सिद्धीचा (बुद्धीचा) दाता तूंचि एक ॥।
तुझिया चरण प्रसादें ||
पावति मुक्तिपदें म्हणूनियां आनंदें ||
ध्यायें तुज बाप || १ ||

(अहो) जय जय जय उदारा स्वामी विघ्नहरा ।।
(अहो ) नमन मोरेश्वरा परिस माझे ॥ध्रु.॥

सकळांसि तू आदी ||
ब्रह्मा तुम्हा तें वंदी ||
देवा म्हणूनि चहूं वेदी नाम तुझें ।।
त्रिपुरावधी शंकरे ।।
स्मरलासि आदरे ||

शेषें पृथ्वी धरितां ।।
स्तवन केले बाप ||२||

महिषासुरमथनीं ||
स्तुति करिती भवानी ॥

अहो ऋषिमुनी ध्यानीं प्रार्थिलासे ।।
जाणावा हा विश्व ||

ध्यायी पंचबाण ||

म्हणोनी गजानन ||
नाम तुझें बाप ||३||

बळिनें देतां दान ||
स्मरलासि विघ्नविनाशन ||

अहो (देवा) म्हणोनि झाला जाण चिरंजीव ।।
जे जैसे ध्याती । त्या तैसा पावसी ।।
म्हणोनि सहस्रनाम मोरयासि बाप ||४||

मोरेश्वरी आदिस्थान ।।
या समागमें चिंचवडासी झाले येणे ।।
देवा भक्तिभाव पूर्ण देखियेला ।।
मोरयाचे चरण ||

धरोनिया जीवी ।।
मोरया गोसावी दास तुझा बाप ||५||

divider-img
मराठी english