पदे पद ४५

पतितपावन सुंदरा ये ये हा श्री मोरेश्वरा ।।
दाखवी चरण उदारा धावे दातारा ।।
धाव रे पाव रे मजला ये ये हा येई दयाळा ।।
न येसील तरी तुझी लाज तुजला ।। १ ।।

हृदयी माझ्या राहावे ये ये हा सनाथ करावें ।।
जन्मो जन्मीं उद्धरावे दास म्हणवावे ।।
निढळावरी बाह्य ठेविता ये ये हा वाट पाहता ।।
मज रे तुझि आ आतां शिणलो मी आतां ।। २ ।।

बहुत दिवस झाले तू ये थे हा येई गणपती ।।
दाखवी चरण मजप्रति फिटेल रे भ्रांती ।
करुणावचने विनवितो ये ये हा दास म्हणवितों ।।
सकळ ही अन्याय क्षमा त्वां करावे आतां ।। ३ ।।

शरीर भोग भोगिले ये ये हा कष्ट हे झाले ।।
कधी तू पावसी माउले धावे दयाळे ।
आता मज न उपेक्षी ये ये डा कोण रे रक्षी ।।
चरण तुझेचि लक्षी तूचि रे साक्षी ।। ४ ।।

अंत माझा न पहावा ये ये हा येई देवा ।।
क्षणभर उशीर न लावावा धावे बा देवा ॥
बहुत दिवस लेखितां ये ये हा कंठेना आतां ।।
धाडी मूळ मज ने आतां सोसेना आता ॥ ५ ॥

नको देऊं यमा हाती ये ये हा दास तुझा रे ।
लाज तुझी तुज रे कठीण नोव्हे रे ।।
कठीण तूं मज झालासी ये ये हा माये तूं कैसी ।।
ब्रीदावळी साच करिसी जाऊ कोणापासी ॥ ६ ॥

आतां एक विनंति ऐकावी ये ये हा दास म्हणवावें ।।
जन्मो जन्मीं उद्धरावें चरणी ठेवावे ।।
चिंतामणी दास विनवी थे ये हा भक्ती ही द्यावी ।।
भक्ती देऊन उद्धरावें हेंचि तारावें ।
पतित पावन सुंदर || ७ ॥

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४