पदे पद ४६

नीळकंठा परशुधरा ये ये हा शक्ति श्रीवरा ।।
प्रभाकरा एक भावें अर्चन करावें ॥ध्रु.॥ ।।

(अहो) पंचमूर्तिच्या ठायी ज्याने ये ये हा द्वैत धरिले ।
आपुलें कर्म करून त्याने नरक साधिले ॥१॥

अहो वरेण्याते स्वमुखेंकरूनी ये ये हा गीता सांगितली ।
उत्तम योगाची ती खूण तेथें जाणविली ॥२॥

गजानन अनंत रूपीं ये ये हा आहे कीं साचा ॥
मायाजाळें मंद मतिसी अनुभव कैचा ॥३॥

यास्तव तुजला प्रार्थितो ये ये हा मनास समजावें ।।
गजाननाचे सर्व ही भावें नामचि वदावें ॥४॥

योगादिक साधनें ये ये हा कशास करावी ।।
स्वल्प प्रयत्ने नित्याभ्यासे मुक्ति सेवावी ॥५॥

अहो मोरया गोसावी यांचे ये ये हा वशिं किंकर ।।
धरणीधर वरदकृपेनें सुखी निरंतर ॥६॥

divider-img