पदे पद ४७

अहो गजानन माझा शिव रूप झाला ।
तोही म्या पाहिला हो आजि डोळा ॥१॥

अहो सिद्धी बुद्धी दोन्ही गंगा गौरी जाणा ।
दशभुज तोहि हो देखिला हा ॥२॥

अहो आयुधे सहित दशहस्ती जाणा ।।
अहो नंदी हा मूषक हो शोभे त्याला ॥३॥

अहो ऐसा गणराज तोही म्यां पाहिला ।।
तत्काळ हा झाला हो विष्णु तोचि ।।४।।

अहो चतुर्भुज तोहि सिद्धि (बुद्धी) हा सहित ।
अंकुश परशु हो चक्र गदा ॥५॥

अहो गरुडवाहन मयूर येथे शोभे ।।
लक्ष्मी नारायण हो म्हणती त्याला ॥६॥

अहो ऐसे तेही नाम सिद्धि विनायक ।।
ऐसे त्रिगुणात्मक हो रूप त्याचे ॥७॥

अहो शिव विष्णु तेही रूप हें धरून ।
अहो साजतील तिन्ही हो गणराजा ॥८॥

अहो मोरया गोसावी ।।
कृपा (दया) मजवर केली ।।

अहो तेणें स्फूर्ति झाली हो वर्णावया (बोलावया ) ॥९॥

अहो अज्ञान बोबडे चिंतामणी वर्णी ।।
अहो मोरयासी रंजवी हो वेळोवेळी ।।१०।।

divider-img