प्रथम हे अधिष्ठान वैकुंठ भुवन ।
अहो रहिवास मूळपीठ ।
भूमंडळासी येउनि ।
अहो प्रकटली विश्वमाता ।
नाम जगदंबा भवानी ।१॥
अहो जोगवा विश्वरूप ।
ब्रम्ह परिपूर्ण स्वरूप ।
अहो नव दिवस पूर्ण झाले ।
योगी हुंकार२ दिधले ।
अहो चंडमुंडा विभांडोनी ।
आसन धातले मूळपीठी ।
अहो जोगवा० ।२॥
अहो जोगावा घालि माये ।
तुज हो मागतसे पाहे ।
अहो देई हो भक्तिरस ।
विनवी मोरया गोसावी ।
अशनी ध्यानी शयनी हो ।
स्मरे गणराज ह्रदयीं ।३॥
आहे जोगवा० ॥
(पद क्र. ४८ व ४९ नवरात्रांत व दर मंगळवारी म्हणतात.)
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper