पदे पद ४

मज सुख पावलें हो ॥
मज सुख पावलें हो ॥
मोरया देखिला हो ॥
श्रम माझा हरला हो ॥
केलें विघ्नेशभजन ॥
तेणे नाशिलें मीतूंपण ॥१॥

यातायाती मी चुकलों ॥
चरणीं (पायी) तुझ्या विनटलों ॥२॥

घेतां नाम तुझे वाचें ॥
भय नाही रे दोषाचे (पापाचें) ॥३॥

न करतां तप तीर्थ ॥
कृपा केली गणनाथ ॥४॥

पूर्वपुण्य जोडी झाली ॥
भेटली गणराज माऊली ॥५॥

भाग्योदय थोर माझा ॥
शरण आलों मी गणराजा (महाराजा) ॥६॥

विनवी चिंतामणी दास ॥
अखंड देई भक्तिरस (प्रेमसुख) ॥७॥

divider-img
मराठी english