मोरेश्वरी आहे माझा मायबाप ।
(माझा) तयासि निरोप हो सांगा वेगी ।१।
तुझे भेटीची आरत ।
वेगी पुरवी मोरेश्वरा ।
(मोरेश्वर) एक वेळा माहेरा मज नेई बापा ।२।
मज दिधले असे दुरी ।
माझे निष्ठुर सासुरी ।
(माहेश्वरा) त्यांच्या घरच्यांनी थोर कष्टविले ।३।
मज करिती सासुरवास ।
निरंतर किती सोसूं ।
(मोरेश्वरा) मजलागि उदास तूं नोहे देवा ।४।
देवा तूं उदास होसी ।
दु:ख सांगू कोणापासी ।
(माय) बाप सखा होसि रे तूंचि माझा ।५।
म्हणूनि येतों काकुलती ।
वेगी पावे मंगलमूर्ति ।
(मोरया गोसावी) तुज प्रति विनवितो आहे ।६।
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper