पदे पद ५३

हें मन वेधेलें हो (अहो) मोरयाचे ध्यानीं ।
आणिक नावडे ह्या मोरयवाचोनी ।
कथा मोरयाची (अहो) सांग माझे कानीं ।
नाही तर प्राण (जिवासी) होऊं पाहे हानी ।१।

मज हसतिल हो (अहो) परि हासोत ।
परि मज सांग त्या मोरयाची मात ।
तेणें मनचे हो (अहो) पुरलें आरत ।
नाहीतर (जिवासी) प्राणा होऊं पाहे घात ।२।

या हो जनासि (अहो) काय मज कज ।
दीननाथ कृपळु महराज ।
एकदंत हो (अहो) सुंदर चतुर्भुज ।
तोचि (हाचि) ह्रुदयीं आठवतो मज ।३।

त्रैलोकीं हो व्यापक गजानन ।
अन्तर (बाह्य) लागले ह्या मोरयाचें ध्यान ।
कांही केलिया हो (अहो) न पुरे तें मन ।
वृथा कासया कराल समाधान ।४।

देह विनटला (अहो) मोरयाची सोय ।
तयासि प्रतिकार न चले हो कांही ।
मोरया गोसावी (अहो) एकरुप देहीं ।
दीन रंक मी रुळे त्याचे पायीं ।५।

divider-img
मराठी english