जय जय हो (अहों) जय गणनाथा ।
तुजवीण कोण सोडविल एकदंता ।
येई येई तू (अहो) येई गजानना ।
उशीर न लावी तुज भाकितों करुणा ।
दुष्ट भोगाची काय सांगू गति ।
भोग भोगितों सांगतों तुजप्रति ।१।
प्रपंचे वेष्टिलें (अहो) कय म्यां करावें ।
तुजविण म्यां कवणा सांगावे ।
उपेक्ष माझी तूं (अहो) न करी उदार ।
तुज विनवितो मी मोरेश्वरा ।२।
जन्मोजन्मीच्या (अहो) होत्या पुण्यराशी ।
तरी मी पावलो तुझिया चरणासी ।
चरणी लाविले (अहो) देवाजी पूर्वीच ।
आत कासया तूं चाळविसी मज ।३।
गर्भवास म्यां (अहो) सोसिले बहुत ।
आतां तुझिया मी आहे निश्चित ।
धांवण्या माझ्या तू उशिर न लावी ।
तुजवीण काय मी देह हा न ठेवी ।४।
ऐसी विनती हो परिसे गणपती ।
तुज म्हणतो राहे माझे चित्ती ।
विनवी दास हो म्हणे चिंतामणी ।
रात्रंदिवस मी तुझे चरणी ।५।
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper