मन माझे वेधले गणराजी ।
वृत्ति बैसली तुझे पायी ।। ध्रु. ।।
अहो वृथा माया लावली हो कां मज बहु भारी ।
मोहापासुनी सोडवावें अरे तुज म्हणे एकभावे ।
मन माझे ।। १ ।।
अहो पुत्रदारा धनादिका ।
चाड नाही जन लोका ।
शरण कोणा जाऊं आणिका ।
अरे तूं मजवरी करी कृपा रे ।
मन माझे ।। २ ।।
अहो पतितपावन नाम तुझे आहे रे त्रयलोकी ।
ब्रीदावळी साच केली अरे मज थोर जोडी झाली ।
मन माझे ।। ३ ।।
अहो भ्रमर मन आहे हो लुब्ध तुझें पायी ।
सुगंधित वास आला आयागमन खुंटलें रे ।
मन माझें ।। ४ ।।
अहो दास तुझा विनवितो चिंतामणि देव ।
दीनरंका तारी वेग त्यासी लावी मुक्तिमार्गी ।
मन माझे ।। ५ ।।
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper