पदे पद ५८

चला जाऊं मोरेश्वरा ।
पाहूं आजी तोची ।

आम्ही गेलों मोरेश्वराऽ ।
पाहूं आजी डोळां ।१।

रूप पाहुनी नयनी ।
सुख वाटे जीवा ।
ऐसें रूप ते पाहिलेंऽ ।
धरिलें ह्रदयी तेंची ।२।

काय सांगूं मी ती गोडी ।
लागे आजी तुझी ।
बहु वेधू हा लागलाऽ ।
दाखवी चरण (पाय) मज ।३।

तुजविण देव नेणें ।
जन्मोजन्मी तूचि ।
कृपा करुनी दिधलाऽ ।
आजि देवराया ।४।

मोरया गोसावी दातार ।
आम्हा देतो वर ।
म्हणूनिया धावें तेथेंऽ ।
मज आजि तोचि ।५।

चिंतामणी दास तुझा तुज मागतसे ।
चरणी ठाव मज देई ।
कोठें नव जाय ।६।

divider-img