पदे पद ५९

मोरया मोरया मोरया ।
जप आजि करा ।

धांवोनिया जाऊ तेथें ।
पाहू मोरेश्‍वरा ।१।

गणेशतीर्थ हे उत्तम ।
स्नान करू तेथें ।
मग जाऊ देवळांतऽ ।
पुजूं देवराया ।२।

देव भक्त हे पाहिले ।
धरिले ह्रदयीं तेची ।
भेद तोचि नाही त्यासीऽ ।
आतां सांगू (बोलू) काय ।३।

मोरया गोसावी दातार ।
जाई मोरेश्वरा ।
तेणें आनंद हा होयऽ ।
मोरेश्वरी पाहा ।४।

ऐसी आनंदाची गोडी ।
ह्रदयी न माये तेची ।
ठक पडोनियां तेथेंऽ ।
गोडी लागे त्याची ।५।

चिंतामणी दास तुझा ।
वेधू लागे तया ।
म्हणुनिया धावे तेथेऽ ।
पाहे मोरेश्वरा ।६।

divider-img
मराठी english