अकळु अवतार कऱ्हे पाठारी ॥
ब्रह्मकमंडलु गंगाऽ ॥
रहिवास तयें तिरीं ॥
भीमकुंड गणेशतीर्थ ॥
तेथिल महिमा थोर ॥
तेथें केलिया पै स्नानऽ ॥
कर्मा (दोषा) नाही ऊरी ॥१॥
जय जय जय जय जय जय लंबोदरा ॥
सकळा सिध्दीचा तूं दाताऽ होशील विघ्नहरा (मोरेश्वरा) ॥
ध्रु० ॥
तुझें केलिया भजन (पूजन) चुकतिल येरझारा ।
तूं हो भक्तजनवत्सलऽ कृपाळू (दयाळू) बा मोरेश्वरा ॥२॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थीसी ॥
चारी द्वारें केलिया मुक्ति होय ॥
चारी दिवस उपवासऽ करोनियां चारि पाहे ॥
एक निष्काम करिती सायुज्यता होय ॥
एक कामना इच्छिती इच्छाफळ (पूर्वफळ) देत आहे ॥३॥
पूर्वद्वारीं ती मांजराई आदिशक्ति माया ॥
दक्षिणद्वारीं ती आसराईऽ भवानी मोहनमाया ॥
पश्चिमद्वारीं ती वोझराई माता वंदुनियां ॥
उत्तरद्वारीं होय मुक्तिऽ मुक्ताबाई देखिलिया (पाहिलीया) ॥४॥
महाद्वारी ती कृपाळू माता गवराई ॥
दृष्टिसन्मुख जननीऽ जवळी उभा भैरवभाई ॥
वृक्ष उत्तम वामभागीं आदिस्थान तये ठाई ॥
वृंदावनीचा महिमाऽ तो मी वर्णू (बोलू) काय ॥५॥
ऐसा परिवार सहित मयूरपुरी (गांवी) आहे ॥
भक्त येतील यात्रेसीऽ तयांचे चित्त (मन) पाहे ॥
मोरया गोसावी दास तूझा तुज नित्य (जवळी आहे) ध्याये ॥
प्रतिमासी दर्शनऽ लोटांगणी (येतो आहे) जाये ॥
जय जय ० ॥६॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper