तुझे तुला देता काय जावे ।
प्राण्या नकळें हो काही ।
लटकाची अहंकार वाढविला ।
साधी तोचि पापाला ।
माझें माझें किती म्हणसी ।
सर्वही टाकून जासी ।
अहो जय जय जय गणराज उदारा ।१।
सकळिक राहिल येथेंची ।
मग बापुडा होसी ।
पुत्र तेचि येथे राहती ।
तैसे तेचि हो पत्नी ।
यम तुज दंड मारिती ।
काकुलती हो येसी ।
अहो जय जय जय गणराज उदारा ।२।
अहो करूणा काही त्याला न ये रे ।
ऐसे जाणून तेही ।
आपुलें हित तेहि करावे ।
मोरयासी भजावे ।
जप तोहि त्याचा करावा ।
पापें जाळून टाका ।
अहो जय ग० उ० ।३।
अहो शुध्द तेचि बापा होउनी ।
जाई स्वानंद लोका ।
ऐसे हित तेचि सांगती ।
मोरया गोसावी दातार ।
चला जाऊ पाहु तयाला ।
तोचि (हाचि) भेटेल आता ।
अहो जय ग. उ. ।४।
अहो चिंचवडी तोचि राहिला ।
चिंतामणी पाहिला ।
भेद तोचि नाही तयाला ।
ऐसे जाणुनी त्याला ।
मग सोय धरी देवाची ।
चिंतामणी चरणाचीं (पायाचीं) ।
अहो जय. ग. उ. ।५।
आहो म्हणुनिया आवडी लागली ।
गणराज (महाराज) चरणी ।
चिंतामणी तोचि पहावा ।
ऐसे धरुनी मनी ।
चिंतामणी दास विनवी ।
भक्ति आपुली दयावी (सेवा आपुली घ्यावी) ।
अहो जय ग.उ.॥
अहो न्यावे त्वांचि माहेरा ॥ अहो जय ० गणराज उदारा ॥६॥
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper