अहो न विचारी गुणदोष ॥
लावूनि कासेसी ॥
उतरी पैलथडी क्षणमात्रे ॥१॥
अहो भवसागर डोहो ॥
दुस्तर हा जाणा ॥
मोरया गोसावी तारील तेथे ॥२॥
अहो म्हणोनि आवडी ॥
लागलीसे तुझी ॥
मोरया गोसाव्याविण नेणें ॥३॥
अहो चिंतामणी देव ॥
पाहे हो नयनी ॥
तेणें सर्व सिध्दी पावतील ॥४॥
अहो ऐशा त्या हो मूर्ती ॥
ह्रदयी धरुनी ॥
जप तोही त्यांचा करूनिया ॥५॥
अहो चिंतामणी दास ॥
स्मरे नित्य त्याला ॥
आणिक दुसरा देव नेणे ॥६॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper