पदे पद ६

चरणी लावूनी तारी तूं कृपावंत (दयावंता) रे ॥
जडजीव तुज नेणती सर्वथा ॥
भूमिभार शरीर जाईल वृथा ॥
दीनवत्सल (भक्तवत्सल) तारी तूं गणनाथा रे ॥१॥

तुझे निजरूप लक्षिता नयनी ॥
महादोष हरती तत्‌क्षणी रे ॥
ॠषिमुनि ध्याती तुज लागोनि ॥
तुझे नाम दुर्लभ चिंतामणी रे ॥२॥

तुझ्या चरणी मज झाला विश्वास ॥
झणी धरशील मज तूं उदास रे ।
तुझे रुप (नाम) ध्यातो अहर्निशी ॥
चुकवी आयागमन तोडी पाशरे ॥३॥

अष्ट महासिद्धी वोळंगती तुझे पायी ॥
तुझा पार तो (तुझे गुह्य ते) बा न कळे वेदासी रे ॥
मोरया गोसावी योगी हा पुण्यराशी ॥
नामसंकीर्तन अखंड मानसी ॥
चरणी० ॥४॥

divider-img
मराठी english