पदे पद ७

अहो गणराजचरणी माझे लुब्धलेसे मन ॥
अहो पहावया निजरुप द्यावें भक्तीचे अंजन ॥
अहो समदृष्टि झालिया जीवा होईल समाधान ॥
अहो न बोले लटके विघ्नराजा तुझी आण रे ॥१॥

अहो मोरेश्वरभजनी प्राण्या कां रे न रमसी ॥
अहो दुर्लभ हा नरदेह देही हित का न विचारिसी ॥
अहो यातायाती भोगून व्यर्थ येरझार भागसी ॥
अहो त्यजुनी कामक्रोध शरण जाई सद्‌गुरुसी ॥२॥

अहो निरसुनि अहं सोहं विघ्नराजा (मोरेश्वरा) शरण जावें ॥
अहो धर्म अर्थ काम मोक्ष सर्वांर्थी भजावे ॥
अहो जप तप अनुष्ठान न लगे साधन करावे ॥
अहो अखंड मोरेश्वरध्यान ह्रदयी धरावे ॥३॥

अहो भजतां मोरेश्वर आम्हा देह सार्थक झाले ॥
अहो न करिता सायास आम्हा ब्रम्ह सांपडले ॥
अहो मोरया गोसावी – गुरूकृपे आम्हा निजरूप जोडलें ॥
अहो विनवी चिंतामणो गोसावी आम्हा निजसुख पावले हो ॥४॥

टीप – ’अहो’ हा शब्द प्रति साथीचे वेळी म्हणावा –

divider-img
मराठी english