पदे पद ८

अहो सखि सांगे सखे प्रति स्वप्न देखिले रात्री ॥
अहो शेंदूरचर्चित मूर्ति देखिली डोळा बाप ॥
अहो तयावरि पुसे बाळा कैसा भासला डोळा ॥
अहो तुजप्रति सांगे वेळो वेळा प्राणसखये ॥१॥

अहो एकदंत लंबोदर कासे पितांबर ॥
अहो भाळी मनोहर शोभला टिळा ॥
अहो सुंदर नयन दोन्ही कुंडले शोभती कानी ॥
अहो रत्न (हिरे) माणिक जोडुनि माथा मुकुट शोभे ॥२॥

अहो परशु कमळ करी मोदक पात्रभरी ॥
अहो अंकुश शोभे करी वरदहस्त ॥
अहो सर्वांगी सुगंध दोंदावरीं नागबंध ॥
अहो विद्या चतुर्दश आनंद करिती तेथे ॥३॥

अहो जडित सुलक्षण नवरत्न भूषण ॥
अहो बाहु बहिवट कंकण शोभती करी ॥
अहो नानापरिचे पुष्प जाति जाई जुई शेवंती ॥
अहो चाफे मोगरे मालती कंठी रुळती माळा ॥४॥

अहो चरण वाकी तोडरू घागऱ्या झणत्कारू ॥
अहो तये ठायी आधारू भक्तजना बाप ॥
अहो मोरया गोसावी दास तुझा करितां देखिला पूजा ॥
अहो देखूनि पुरला माझा मनोरथ बाप ॥५॥

(टीप – प्रत्येक कडव्याची सुरूवात ’अहो’ ने करावी. )

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४